नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं
आज आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
( PMJJBY ) कसा मिळवायचा व त्याचा फॉर्म कसा भरायचा याबद्दल माहिती जाणून घेऊ. हा विमा आपल्या केंद्र सरकारचा आहे. ह्या विमा साठी वार्षिक प्रीमियम किती व विमा राशी किती मिळणार ते आपण सविस्तर पणे जाणून घेऊ. तसेच ह्या विमा साठी आवश्यक पात्रता काय आहे हे पण जाणून घेऊ.आणि ही एक मुदत विमा योजना आहे.
मित्रांनो आजच्या आपल्या धकाकधकीच्या जीवनामध्ये आपली सुरक्षा सगळ्यात महत्वाची आहे. तसेच कोरोनासारख्या या जीवघेण्या काळात पण आपली सुरक्षा सगळ्यात महत्वाची आहे.
यासाठी आपले माननीय पंतप्रधान मोदी सरकारने एक स्वस्त प्रीमियम योजना सुरू केली आहे. तीच नाव आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ( PMJJBY )
सर्वात आधी ह्या विमा बद्दल वित्त मंत्रालयाने म्हणजेच (Finance Ministry ) ट्विटरद्वारे या बद्दल माहिती सांगितली आहे.
ह्या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
मित्रांनो यामधे आपण गुंतवणूक केल्यानंतर जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळणार आहेत.
✓ योजनेची सुरुवात - 9 मे 2015 रोजी झाली.
✓ लाभ - या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे बँक खाते आवश्यक आहे. आणि हो सगळ्यात महत्वाचे जर तुमचं बँक खात बंद असेल किंवा प्रीमियम कट होण्याच्या वेळी खात्यात पूर्ण शिल्लक नसल्यास विमा रद्द केला जाऊ शकतो याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
आता ह्या योजनेचे महत्वपूर्ण वैशिष्ट पाहू
1) ही योजना आपल्याला 55 वर्षापर्यंत कव्हर देते.
2) वयाची अट - 18 ते 50 वर्षे या वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
3) विमा राशी - कोणत्याही कारणामुळे जर विमाधरकाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला 2 लाख रुपये मिळू शकतात.
आणि हो सगळ्यात महत्वाचे विमा खूप स्वस्त आहे
4) वार्षिक प्रीमियम - PMJJBY चे वार्षिक प्रीमियम फक्त 330 रुपये आहे.
प्रीमियम स्वस्त असल्याने आपल्याला परवडणारा आहे
5) पात्रता - आपले वय 18 ते 50 वर्ष असावे. व एक बचत खाते असावे
6 ) विमा कालावधी - वार्षिक : 1 जून ते 31 मे
जो कोणी पण व्यक्ती हा विमा घेतो त्याची प्रीमियम राशी 330 रुपये त्याच्या बचत खात्यातून बँक द्वारे दर वर्षी कट होते.
महत्वाची गोष्ट - कोणती पण व्यक्ती केवळ एक बचत खाता द्वारे ह्या योजनेसाठी पात्र ठरतो.
ह्या योजनेच्या नियम व अटी -
1 ) योजनेच्या 55 वर्षानंतर विमा आपोआप संपेल.
2) PMJJBY शी एखादा व्यक्ती फक्त बँक खाते व विमा कंपनी शी संबंधित असू शकते.
3) PMJJBY विमा क्लेम करण्यासाठी विमधरकाचे जे कोणी पण उत्तराधिकारी आहे व ज्या व्यक्तीकडे विम्याचे खाते आहे त्यांनी अशा बँक शाखेशी संपर्क साधावा. संपर्क साधल्यानंतर विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र व क्लेम फॉर्म जमा करावा लागतो. व काही दिवसांनी बँकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्या हक्काची रक्कम नामनिर्देशित व्यक्तीच्या बँक खात्यात वर्ग केली जाते.
4 ) आणि हो मित्रांनो ही एक फक्त मदतीची विमा पॉलिसी असल्याने फक्त ह्या पॉलिसी मधे मृत्यूचा समावेश करण्यात आला आहे.
5 ) ह्या पॉलिसी मधे maturity benifit, surender value यामधे काही नाही.
✓ आता आपण पाहू जीवन विमा कोणत्या कारणामुळे समाप्त होऊ शकतो.
1) बँकेचे खाते बंद झाल्यावर किंवा विमा कवर चालू असताना खात्यात रक्कम नसणे.
2) जेव्हा पॉलिसी धारकाचे वय 55 वर्ष पूर्ण होईल तेव्हा ही योजना बंद होईल.
✓ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत विमधरकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनी द्वारा मृत्यूचा दावा 30 दिवसांच्या आत विनिर्धारित दावा फॉर्म त्याच्या बँक शाखेत जमा केला पाहिजे.
{ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना राशी कशी मिळवावी त्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे }
विमा अंतर्गत खातेधारकचा मृत्यु झाल्यास त्याच्या नॉमिनी ला 200000 रुपये द्यावे लागतात. पण नोमिनी ला 30 दिवसांच्या आत दावा प्रस्तुत करावा लागतो.
दावा कसा मिळवायचा ----------------------------------
# नॉमिनी ने सदस्याचे मृत्यु प्रमाणपत्र घेऊन बँकेत जाऊन संपर्क करावा तिथे बँक आधिकारी माहिती देतील.
# नॉमिनी ने विमा कंपनी ला संपर्क करून दावा फॉर्म मिलवावा.
# नॉमिनी ने दावा फॉर्म पूर्ण भरने व जमा करणे.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
नॉमिनी ज्या वेळेस बँकेत दावा करेल त्या वेळेस खालील कागदपत्रे तयार ठेवावीत
1) पूर्णपणे भरलेले दावा फॉर्म
2) मृत्यू प्रमाणपत्र
3)नोमिनिचा कोरा चेक ची xerox
4) पोच पावती
✓ सगळ्यांनी या योजनेचा लाभ का घ्यायला पाहिजे
1) योजना घेताना मेडिकल चेक अप होत नाही
2) फसवणूक होणार नाही कारण ही योजना सरकारी आहे
3) सगळ्या वयोगायसठी प्रीमियम एकसारखे आहे.
आता ह्या योजनेसाठी फॉर्म कसा मिळवायचा
Jansuraksha.gov.in ह्या वेबसाईट ला भेट द्या
Comments
Post a Comment