Skip to main content

1960 पासून ते आजपर्यंत सर्व माननीय मुख्यमंत्र्यांची कारकीर्द व कार्यकाळ | List of all chief minister of maharashtra

 

List of all chief minister of maharashtra
List of all chief minister of maharashtra


List of all chief minister of maharashtra : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच ह्या पोस्ट मध्ये आज आपण ह्या पोस्ट मध्ये 1960 पासून ते आजपर्यंत सर्व माननीय मुख्यमंत्र्यांची कारकीर्द व कार्यकाळ  (List of all chief minister of maharashtra)  बघणार आहोत. हि माहिती तुम्हाला (MPSC EXAM , UPSC EXAM , BANKING EXAM , CLERK EXAM , MHADA BHARTI, जिल्हा परिषद भरती ) यासारख्या अनेक सरकारी नोकरी साठी उपयुक्त आहे.

List of all chief minister of maharashtra

महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री यादी

1960 ते 2024

1960 पासून आजपर्यंत सर्व माननीय मुख्यमंत्र्यांची कारकीर्द व कार्यकाळ 

आज आपण महाराष्ट्र राज्याचे 1960 पासून ते आजपर्यंत सर्व मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ व कारकीर्द पाहणार आहोत. 

सर्व प्रथम आपण महाराष्ट्र राज्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ.

महाराष्ट्र जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 

✓ महाराष्ट्र राज्याची स्थापना 1  मे, 1960. रोजी झाली.

✓ महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौ. की. मी. इतके आहे.

✓ आपल्या महाराष्ट्र राज्याचा पूर्व - पश्चिम विस्तार सुमारे 800 की. मी. इतका आहे.

✓ आपल्या महाराष्ट्र राज्याचा दक्षिण - उत्तर विस्तार सुमारे 700 की.मी. इतका आहे.

✓ सर्वात महत्वाचे सांगायचे झाल्यास आपल्या राज्यास सुमारे 720 की.मी. इतका लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. 

✓ महाराष्ट्र राज्यात एकूण जिल्ह्यांची संख्या 36 आहे.

✓ तसेच राज्यात 358 तालुके आहेत.

✓ आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपुर आहे ( नागपुर शहर हे संत्र हे फळासाठी प्रसिध्द आहे. तसेच नागपूरची संत्रा बर्फी ही सुद्धा प्रसिद्ध आहे. )

✓ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 आहे. प्रशासकीय विभाग खालीलप्रमाणे - 

1) नाशिक 

 2) पुणे

 3) कोकण 

 4) औरंगाबाद

 5) अमरावती

 6) नागपूर 

✓ महाराष्ट्र राज्यात 7 कटकमंडळे आहेत. मित्रांनो कटकमंडले म्हणजेच इंग्लिश मधे त्याला ( कँटोन्मेंट बोर्ड्स ) असे म्हणतात.


आपण महाराष्ट्र रज्याबद्दल थोडक्यात व महत्वपूर्ण अशी माहिती पाहिली 

✓आता आपण माननीय मुख्यमंत्र्यांची कारकीर्द व कार्यकाळ पाहू

महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री यादी

स्वतंत्र महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला होता माननीय यशवंतराव चव्हाण यांना.

1)महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री - माननीय यशवंतराव चव्हाण.

✓कार्यकाळ - 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962.

 यशवंतराव चव्हाण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आमदार होते. तसेच त्यांचा मतदार संघ कराड नॉर्थ हा त्यांचा विधानसभा मतदार संघ होता.


2) महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री - माननीय मारुतराव कन्नमवार.

 ✓ कार्यकाळ - 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963.

 मारुतराव कन्नमवार हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आमदार होते.

 तसेच त्यांचा साओली हा त्यांचा विधानसभा मतदार संघ होता.


3) महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री - माननीय पी. के. सावंत

✓ कार्यकाळ - 25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963.

पी. के. सावंत ह्यांचा चिपळूण हा विधानसभा मतदार संघ होता.

पी. के. सावंत यांच्याबद्दल विशेष सांगायचे म्हणजे ते महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ फक्त 9 दिवसांचा होता.


4) महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री - माननीय वसंतराव नाईक

✓ कार्यकाळ - 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975.

वसंतराव नाईक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आमदार होते.

तसेच त्यांचा पुसद विधानसभा मतदार संघ होता.


 विशेष गोष्ट - वसंतराव नाईक ह्यांना सर्वाधिक कार्यकाळ मिळाला.वसंतराव नाईक हे  11 वर्ष 77 दिवस सलग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ही गोष्ट नमूद करून घ्यावी.


महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री 


5) महाराष्ट्राचे पाचवे मुख्यमंत्री - माननीय शंकरराव चव्हाण.

✓ कार्यकाळ - 21 फेब्रुवारी 1975 ते 16 मे 1977.

शंकरराव चव्हाण हे भोकर विधानसभा संघातून ते आमदार झाले. काँग्रेस चे आमदार होते.


6) महाराष्ट्राचे सहावे मुख्यमंत्री - माननीय वसंतदादा पाटील.

✓कार्यकाळ - 17 मे 1977 ते  5 मार्च 1978.

                    5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978.

                    2 फेब्रुवारी 1983 ते 9 मार्च 1985.

                      10 मार्च 1985 ते 1जून 1985.

                                                                 

 वसंतदादा पाटील हे महाराष्ट्र राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिले आहे. वसंतदादा पाटील जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मित्रांनो ते विधानपरिषदेचे आमदार होते. तसेच दुसऱ्या कार्यकाळात म्हणजे 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978. या कार्यकाळात सांगली विधानसभा या मतदार संघातून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आमदार होते.


7) महाराष्ट्राचे सातवे मुख्यमंत्री - माननीय शरद पवार.

✓ कार्यकाळ - 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980. 

शरद पवार यांचा बारामती विधानसभा हा मतदार संघ होता. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधून आमदार झाले होते.

वाचकांनो आतापर्यंत आपण 7 मुख्यमंत्री पाहिले.

यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980 या कार्यकाळात राष्ट्रपती राजवट लागू झाली.


8) महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री - माननीय अब्दुल रहमान अंतुले.

✓ कार्यकाळ - 9 जून 1980 ते 21 जानेवारी 1982. ते काँग्रेस चे आमदार होते. त्यांचा मतदार संघ हा श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ होता.


9) महाराष्ट्राचे नववे मुख्यमंत्री - माननीय बाबासाहेब भोसले.

✓ कार्यकाळ - 21 जानेवारी 1982 ते 1फेब्रुवारी 1983 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आमदार होते. नेहरूनगर हा त्यांचा मतदार संघ होता.


10) महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री - माननीय वसंतदादा पाटील

✓ कार्यकाळ - 2 फेब्रुवारी 1983  ते 1 जून 1985. 

वसंतदादा पाटील यांना दुसऱ्यांदा मुखमंत्री होण्याची संधी मिळाली. काँग्रेस पक्षातून सांगली या विधानसभा मतदार संघातून आमदार होते.


11) महाराष्ट्राचे अकरावे मुख्यमंत्री - माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकर.

✓ कार्यकाळ - 3 जून 1985 ते 6 मार्च 1986. त्यांचा पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होता.शिवाजीराव पाटील हे निलंगा ह्या मतदार संघाचे आमदार होते.


12) महाराष्ट्राचे बारावे मुख्यमंत्री - माननीय शंकरराव चव्हाण.

✓ कार्यकाळ - 12 मार्च 1986 ते 26 जून 1988.

शंकरराव चव्हाण यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.

त्यावेळेस ते काँग्रेस पक्षात होते. आणि विशेष म्हणजे ते विधानपरिषदेचे आमदार होते.


13) महाराष्ट्राचे तेरावे मुख्यमंत्री - माननीय शरद पवार.

✓ कार्यकाळ - 26 जून 1988 ते 25 जून 1991. शरद पवार हे बारामती विधानसभा मतदार संघातून आमदार होते.


14) महाराष्ट्राचे चौदावे मुख्यमंत्री - माननीय सुधाकरराव नाईक.

✓ कार्यकाळ - 25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993. सुधाकरराव नाईक यांचा काँग्रेस पक्ष होता व ते पुसद या विधानसभा मतदार संघातून आमदार होते.


15) महाराष्ट्राचे पंधरावे मुख्यमंत्री - माननीय शरद पवार.

✓ कार्यकाळ - 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995. शरद पवार साहेब पुन्हा एकदा बारामती विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री झाले.


1960 पासून ते आजपर्यंत सर्व माननीय मुख्यमंत्र्यांची कारकीर्द व कार्यकाळ | List of all chief minister of maharashtra


आणि मित्रांनो काही काळानंतर म्हणजे 1995 नंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आले व त्यांनी सत्ता स्थापन केली. म्हणजेच त्यांची युती झाली. 


युती झाल्यानंतर युतीचे पाहिले मुख्यमंत्री झाले माननीय मनोहर जोशी. मनोहर जोशी हे त्यावेळेस शिवसेना मधे कार्यरत होते.


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°विशेष म्हणजे मनोहर जोशी हे शिवसेना चे पहिले मुख्यमंत्री.

 होते.

 °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

16) महाराष्ट्राचे सोळावे मुख्यमंत्री - माननीय मनोहर जोशी.

✓ कार्यकाळ - 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999. दादर हा त्यांचा विधानसभा मतदार संघ होता. आणि दादर ह्या मतदार संघातून ते आमदार होते.


17) महाराष्ट्राचे सतरावे मुख्यमंत्री - माननीय नारायण राणे.

✓कार्यकाळ - 1फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999. नारायण राणे हे शिवसेना चे दुसरे मुख्यमंत्री झाले. तसेच ते मालवण या मतदार संघातून आमदार झाले.


Motivation

18) महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री - माननीय विलासराव देशमुख.

विलासराव देशमुख यांचे मूळ गाव बाभुळगाव , तालुका व जिल्हा लातूर आहे. 

✓ कार्यकाळ - 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003. त्यांचा विधानसभा मतदार संघ हा लातूर होता. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आमदार होते.


List of all chief minister of maharashtra

19) महाराष्ट्राचे एकोणिसावे मुख्यमंत्री - माननीय सुशीलकुमार शिंदे.

✓ कार्यकाळ - 18 जानेवारी 2003 ते 30 ऑक्टोबर 2004.

सुशीलकुमार शिंदे यांचा मतदार संघ हा सोलापूर होता. ते काँग्रेस या पक्षातून मुख्यमंत्री झाले होते.


20) महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री - माननीय विलासराव देशमुख.

✓ कार्यकाळ - 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008. पुन्हा एकदा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले. त्यांचा मतदार संघ हा लातूर होता. 


21) महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री - माननीय अशोक चव्हाण. 

✓ कार्यकाळ - 4 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010. अशोक चव्हाण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आमदार होते. त्यांचा भोकर हा विधानसभा मतदार संघ होता.


22) महाराष्ट्राचे बाविसावे मुख्यमंत्री - माननीय पृथ्वीराज चव्हाण. 

✓ कार्यकाळ - 11 नोव्हेंबर 2010 ते 26 सप्टेंबर 2014. पृथ्वीराज चव्हाण हे विधानपरिषदेचे आमदार होते. ते काँग्रेस पक्षात होते.


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

विशेष -  काही काळानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्या राष्ट्रपती राजवटीचा कार्यकाळ - 

28 सप्टेंबर 2014 ते 30 ऑक्टोबर 2014 

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

23) महाराष्ट्राचे तेविसावे मुख्यमंत्री - माननीय देवेंद्र फडणवीस.

✓ कार्यकाळ - 31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019. देवेंद्र फडणवीस हे भाजपा चे आमदार होते. तसेच नागपूर विधानसभा मतदार संघातून ते भाजपाचे पहिले मुख्यमंत्री झाले.


नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. राष्ट्रपती राजवटीची कार्यकाळ - 

12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019. 

त्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस , शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महविकास आघाडी चे सरकार आले.


24) महाराष्ट्राचे चोवीसावे मुख्यमंत्री - माननीय उध्दव साहेब ठाकरे.

✓ कार्यकाळ - 28 नोव्हेंबर 2019 ते 2022

पक्ष - शिवसेना.

25) महाराष्ट्राचे पंचविसावे मुख्यमंत्री - माननीय एकनाथ शिंदे.

✓ कार्यकाळ - ३० जून २०२२

पक्ष - शिवसेना.

26) महाराष्ट्राचे सविसावे मुख्यमंत्री 
 माननीय देवेंद्र फडणवीस
कार्यकाळ – ५ डिसेंबर २०२४
पक्ष - भाजपा

Summary ( सारांश ) : 

मित्रांनो अशा प्रकारे आपण आज ह्या पोस्ट मध्ये 1960 पासून ते आजपर्यंत सर्व माननीय मुख्यमंत्र्यांची कारकीर्द व कार्यकाळ (List of all chief minister of maharashtra) बघितला. हि महत्वपूर्ण अशी (महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री यादी) माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना share करा 

 धन्यवाद.................................

Comments

Popular posts from this blog

Gk Questions In Marathi | सामान्य ज्ञान प्रश्न मराठी

GK Questions In Marathi   : नमस्कार मित्रांनो आज आपण सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त असे सामान्य ज्ञान प्रश्नसंच बघणार आहोत. मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करत असाल तर 'सामान्य ज्ञान मराठी' हा विषय अतिशय महत्वाचा विषय आहे. म्हणून आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी ( GK questions in marathi ) वाचणार आहोत. तसेच सध्या पुणे महानगर पालिका ( PMC recruitment )  व पिंपरी चिंचवड महानगरपालिका ( pcmc recruitment) यांच्या परीक्षा चालू आहे. ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला ' gk marathi ' हा विषय नक्की असतो. ह्या विषया मधे तुम्हाला चांगले मार्क्स मिळावे म्हणून मी महत्वाचे प्रश्न घेतले आहे. Gk Questions In Marathi | सामान्य ज्ञान प्रश्न मराठी तसेच ' मराठी सामान्य ज्ञान '  व  ' प्रश्न उत्तरे मराठी ' म्हणजेच '  महाराष्ट्रातील व भारतातील सामान्य ज्ञान ' तुम्हाला जिल्हा परिषद भरती यासाठी प्रश्न उत्तरे नक्की विचारतात. तुम्ही जर आरोग्य सेवक ची तयारी करत असाल तर तुम्ही 'marathi gk' ह्या विषयाची तयारी करून पैकीच्य...

50+ मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 50+ Marathi Amazing Interesting Facts

  interesting facts in marathi नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमचे स्वागत आहे . मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाचनाची अत्यंत आवड असते. अगदी आपल्या वाचनाची सुरवात सकाळी सकाळी वर्तमानपत्र ने नक्कीच होत असते. वाचनाने नक्कीच आपल्याला फायदा होत असतो . आपल्याला दररोज नवीन काहीतरी जाणून घ्यायला खूप आवडते म्हणून ही पोस्ट तुमच्यासाठी आहे.  (Marathi Rochak Tathya) आजच्या पोस्ट मध्ये मराठी रोचक तथ्य वाचणार आहोत. आजच्या या पोस्ट मध्ये आपण  (50 मराठी रोचक तथ्य वाचणार आहोत)  मराठी रोचक तथ्य 50+ मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य : चला तर मग वाचायला सुरुवात करूया 50+ मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 50+ Marathi Amazing Interesting Facts 1) जगातील शाकाहारी लोकांचे सर्वात जास्त प्रमाण भारत देशात आहे. 2) हमिंगबर्ड हा एक असा पक्षी आहे जो मागील बाजूने उडू शकतो. 3) ऑक्टोपस ला तीन हृदय असतात. 4) आपल्या ओठांना कधीच घाम येत नाही 5) घोडा हा प्राणी उभा राहून झोपू शकतो. 6) सगळ्यात मोठे अंडे कोण देते बर...... मित्रांनो आपण कोंबडीचे अंडे पाहतो ते आकाराने लहान असते. पण तुम्हाला माहीत आहे का सर्वात मोठे ...

General knowledge Marathi | सामान्य ज्ञान मराठी

  General knowledge Marathi : मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षेला वारंवार विचारले जाणारे सामान्य ज्ञान मराठी( gk questions in marathi )  या विषयावर आधारित महत्वाचे 100 प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न मागे झालेल्या सरळसेवा भरती, आरोग्य विभाग भरती, पोलीस भरती , जिल्हा परिषद भरती ह्या परीक्षांना आलेले आहेत.   सामान्य ज्ञान मराठी  | General knowledge Marathi Gk  ( जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी, महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी, महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf, जनरल नॉलेज मराठी प्रश्न, मराठी जनरल नॉलेज, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे, मराठी प्रश्न उत्तरे, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी , सामान्य ज्ञान प्रश्न, gk questions in marathi, general knowledge questions and answers in marathi for mpsc, gk questions in marathi with answers, सामान्य ज्ञान मराठी,      Gk Marathi          General Knowledge in Marathi 1) असा कोणता पदार्थ आहे जो पाण्यात विरघळत नाही ? उत्तर - रांगोळी. 2) भारतीय संगीताचा पाया असे खालील पैकी कश...

Samanarthi Shabd In Marathi | समानार्थी शब्द मराठी

Samanarthi Shabd Marathi - नमस्कार मित्रांनो आज आपण सर्व परीक्षेसाठी म्हणजेच महाराष्ट्रातील सरळसेवा भरती साठी अत्यंत महत्वाचे असे समानार्थी शब्द वाचणार आहोत. सरळसेवा भरती - आरोग्य विभाग गट - क , आरोग्य विभाग गट - ड , जिल्हा परिषद भरती , पशुसंवर्धन भरती , पाटबंधारे विभाग , midc , शिक्षक भरती , तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असे समानार्थी शब्द वाचणार आहोत. मराठी समानार्थी शब्द Samanarthi Shabd In Marathi | समानार्थी शब्द मराठी    1) चंद्रिका - कौमुदी, चांदणे, 2) चव - रुची, शशांक, सोम, सुधाकर, इंदु  3) चवड - रास, ढीग, चळत 4) चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई  5) चढण - चढ, चढाव, चढाई  6) झुणका - बेसन, पिठले,   7) झुंज - टक्कर, संघर्ष, लढा 8) झाड - वृक्ष, तरू, दुमु, पादप  9) जल - जीवन,  तोय, उदक, पाणी, नीर 10) जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक  समानार्थी शब्द मराठी 100 11) चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष,  12) चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, वासुदेव, कृष्ण, शेषशायी 13) चाल - चढाई, रीत, हला 14) छाया - सावली, प...

शब्दसमूहाबद्दल एक शब्द | One Word Substitution In Marathi

अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठी (One word about many words in marathi) : नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या पोस्ट मध्ये अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठी (One word about many words in marathi) बघणार आहोत. म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये ह्या शब्दांना खूप महत्वाचे स्थान आहे. हे '(अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठी)' हा मराठी व्याकरणातला अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा, mpsc, upsc, जिल्हा परिषद भरती, पोलीस भरती, म्हाडा भरती, शिपाई, परिचर , यांसारख्या सरळसेवा भरती चा अभ्यास करत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे.  पोलीस भरती सामान्य ज्ञान मराठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द मराठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द  One Word Substitution In Marathi तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे सर्व विद्यार्थ्यांनी  '  मराठी व्याकरण ' हा विषय चांगला अभ्यास केला तर  तुम्हाला नक्कीच फायदा होईल. येणाऱ्या आगामी  पोलीस भरती तसेच तलाठी भरती प्रश्नसंच  साठी हे प्रश्न खूप महत्वाचे आहे. अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठी  (One word about many words in marathi) दुसऱ्याच्या...

छोटे सुविचार मराठी | Small Quotes Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण motivational सुविचार वाचणार आहोत. छोटे सुविचार मराठी Small Quotes Marathi छोटे सुविचार मराठी marathi suvichar chote : 1 ) तुम्हाला जर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही नम्र राहिले पाहिजे. 2) डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही,      व भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाही. 3) माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात      एक म्हणजे वाचलेली पुस्तके,     आणि दुसरी भेटलेली माणसं. 4) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा. 5) विजेते जबाबदारी घेतात. अपयशी इतरांना दोष देतात -    ब्रिट हमी. 6) आजचे विज्ञान उद्याचे तंत्रज्ञान आहे - एडवर्ड टेलर. 7) जो मनाला जिंकतो, तो जगलाही जिंकू शकतो. 8) जेव्हा मन प्रसन्न असते , तेव्हा बुद्धी स्थिर असते. 9) कठीण काळात सतत स्वतःला सांगा      शर्यत अजून संपलेली नाही,     कारण मी अजून जिंकलेलो नाही. 10) जिंकण्याची मजा तेव्हाच येते,       जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. धन्यवाद.

Hotel Names : Hotel Name Ideas For Your Buisiness

  When starting a hotel business, choosing the right name can have a significant impact on its long-term success. A great hotel name should create a memorable first impression, reflect the brand identity, and appeal to the target audience. However, it is not an easy thing, many factors are important when starting a hotel business. Such as naming trends, attractiveness of hotels and domain availability.  Hotel Names Hotel Name Ideas For Your Buisiness In this article , we've worked through everything from understanding your brand identity and audience to brainstorming and research. You will surely love to evaluate and test your shortlisted names. And let's explore the basics of naming a hotel business, until making your final choice. Food taste is a very important factor when starting a hotel business . A hotel's name is important to stay ahead of the competition and thrive in the ever-changing hospitality and hotel industry. While choosing a name, the name should be catchy...