List of all chief minister of maharashtra
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री यादी
1960 ते 2024
1960 पासून आजपर्यंत सर्व माननीय मुख्यमंत्र्यांची कारकीर्द व कार्यकाळ
आज आपण महाराष्ट्र राज्याचे 1960 पासून ते आजपर्यंत सर्व मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ व कारकीर्द पाहणार आहोत.
सर्व प्रथम आपण महाराष्ट्र राज्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ.
महाराष्ट्र जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे
✓ महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे, 1960. रोजी झाली.
✓ महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौ. की. मी. इतके आहे.
✓ आपल्या महाराष्ट्र राज्याचा पूर्व - पश्चिम विस्तार सुमारे 800 की. मी. इतका आहे.
✓ आपल्या महाराष्ट्र राज्याचा दक्षिण - उत्तर विस्तार सुमारे 700 की.मी. इतका आहे.
✓ सर्वात महत्वाचे सांगायचे झाल्यास आपल्या राज्यास सुमारे 720 की.मी. इतका लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
✓ महाराष्ट्र राज्यात एकूण जिल्ह्यांची संख्या 36 आहे.
✓ तसेच राज्यात 358 तालुके आहेत.
✓ आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपुर आहे ( नागपुर शहर हे संत्र हे फळासाठी प्रसिध्द आहे. तसेच नागपूरची संत्रा बर्फी ही सुद्धा प्रसिद्ध आहे. )
✓ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 आहे. प्रशासकीय विभाग खालीलप्रमाणे -
1) नाशिक
2) पुणे
3) कोकण
4) औरंगाबाद
5) अमरावती
6) नागपूर
✓ महाराष्ट्र राज्यात 7 कटकमंडळे आहेत. मित्रांनो कटकमंडले म्हणजेच इंग्लिश मधे त्याला ( कँटोन्मेंट बोर्ड्स ) असे म्हणतात.
आपण महाराष्ट्र रज्याबद्दल थोडक्यात व महत्वपूर्ण अशी माहिती पाहिली
✓आता आपण माननीय मुख्यमंत्र्यांची कारकीर्द व कार्यकाळ पाहू
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री यादी
स्वतंत्र महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला होता माननीय यशवंतराव चव्हाण यांना.
1)महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री - माननीय यशवंतराव चव्हाण.
✓कार्यकाळ - 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962.
यशवंतराव चव्हाण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आमदार होते. तसेच त्यांचा मतदार संघ कराड नॉर्थ हा त्यांचा विधानसभा मतदार संघ होता.
2) महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री - माननीय मारुतराव कन्नमवार.
✓ कार्यकाळ - 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963.
मारुतराव कन्नमवार हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आमदार होते.
तसेच त्यांचा साओली हा त्यांचा विधानसभा मतदार संघ होता.
3) महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री - माननीय पी. के. सावंत
✓ कार्यकाळ - 25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963.
पी. के. सावंत ह्यांचा चिपळूण हा विधानसभा मतदार संघ होता.
पी. के. सावंत यांच्याबद्दल विशेष सांगायचे म्हणजे ते महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ फक्त 9 दिवसांचा होता.
4) महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री - माननीय वसंतराव नाईक
✓ कार्यकाळ - 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975.
वसंतराव नाईक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आमदार होते.
तसेच त्यांचा पुसद विधानसभा मतदार संघ होता.
विशेष गोष्ट - वसंतराव नाईक ह्यांना सर्वाधिक कार्यकाळ मिळाला.वसंतराव नाईक हे 11 वर्ष 77 दिवस सलग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ही गोष्ट नमूद करून घ्यावी.
महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री
5) महाराष्ट्राचे पाचवे मुख्यमंत्री - माननीय शंकरराव चव्हाण.
✓ कार्यकाळ - 21 फेब्रुवारी 1975 ते 16 मे 1977.
शंकरराव चव्हाण हे भोकर विधानसभा संघातून ते आमदार झाले. काँग्रेस चे आमदार होते.
6) महाराष्ट्राचे सहावे मुख्यमंत्री - माननीय वसंतदादा पाटील.
✓कार्यकाळ - 17 मे 1977 ते 5 मार्च 1978.
5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978.
2 फेब्रुवारी 1983 ते 9 मार्च 1985.
10 मार्च 1985 ते 1जून 1985.
वसंतदादा पाटील हे महाराष्ट्र राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिले आहे. वसंतदादा पाटील जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मित्रांनो ते विधानपरिषदेचे आमदार होते. तसेच दुसऱ्या कार्यकाळात म्हणजे 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978. या कार्यकाळात सांगली विधानसभा या मतदार संघातून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आमदार होते.
7) महाराष्ट्राचे सातवे मुख्यमंत्री - माननीय शरद पवार.
✓ कार्यकाळ - 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980.
शरद पवार यांचा बारामती विधानसभा हा मतदार संघ होता. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधून आमदार झाले होते.
वाचकांनो आतापर्यंत आपण 7 मुख्यमंत्री पाहिले.
यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980 या कार्यकाळात राष्ट्रपती राजवट लागू झाली.
8) महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री - माननीय अब्दुल रहमान अंतुले.
✓ कार्यकाळ - 9 जून 1980 ते 21 जानेवारी 1982. ते काँग्रेस चे आमदार होते. त्यांचा मतदार संघ हा श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ होता.
9) महाराष्ट्राचे नववे मुख्यमंत्री - माननीय बाबासाहेब भोसले.
✓ कार्यकाळ - 21 जानेवारी 1982 ते 1फेब्रुवारी 1983
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आमदार होते. नेहरूनगर हा त्यांचा मतदार संघ होता.
10) महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री - माननीय वसंतदादा पाटील
✓ कार्यकाळ - 2 फेब्रुवारी 1983 ते 1 जून 1985.
वसंतदादा पाटील यांना दुसऱ्यांदा मुखमंत्री होण्याची संधी मिळाली. काँग्रेस पक्षातून सांगली या विधानसभा मतदार संघातून आमदार होते.
11) महाराष्ट्राचे अकरावे मुख्यमंत्री - माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकर.
✓ कार्यकाळ - 3 जून 1985 ते 6 मार्च 1986. त्यांचा पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होता.शिवाजीराव पाटील हे निलंगा ह्या मतदार संघाचे आमदार होते.
12) महाराष्ट्राचे बारावे मुख्यमंत्री - माननीय शंकरराव चव्हाण.
✓ कार्यकाळ - 12 मार्च 1986 ते 26 जून 1988.
शंकरराव चव्हाण यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.
त्यावेळेस ते काँग्रेस पक्षात होते. आणि विशेष म्हणजे ते विधानपरिषदेचे आमदार होते.
13) महाराष्ट्राचे तेरावे मुख्यमंत्री - माननीय शरद पवार.
✓ कार्यकाळ - 26 जून 1988 ते 25 जून 1991. शरद पवार हे बारामती विधानसभा मतदार संघातून आमदार होते.
14) महाराष्ट्राचे चौदावे मुख्यमंत्री - माननीय सुधाकरराव नाईक.
✓ कार्यकाळ - 25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993. सुधाकरराव नाईक यांचा काँग्रेस पक्ष होता व ते पुसद या विधानसभा मतदार संघातून आमदार होते.
15) महाराष्ट्राचे पंधरावे मुख्यमंत्री - माननीय शरद पवार.
✓ कार्यकाळ - 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995. शरद पवार साहेब पुन्हा एकदा बारामती विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री झाले.
1960 पासून ते आजपर्यंत सर्व माननीय मुख्यमंत्र्यांची कारकीर्द व कार्यकाळ | List of all chief minister of maharashtra
आणि मित्रांनो काही काळानंतर म्हणजे 1995 नंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आले व त्यांनी सत्ता स्थापन केली. म्हणजेच त्यांची युती झाली.
युती झाल्यानंतर युतीचे पाहिले मुख्यमंत्री झाले माननीय मनोहर जोशी. मनोहर जोशी हे त्यावेळेस शिवसेना मधे कार्यरत होते.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°विशेष म्हणजे मनोहर जोशी हे शिवसेना चे पहिले मुख्यमंत्री.
होते.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
16) महाराष्ट्राचे सोळावे मुख्यमंत्री - माननीय मनोहर जोशी.
✓ कार्यकाळ - 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999. दादर हा त्यांचा विधानसभा मतदार संघ होता. आणि दादर ह्या मतदार संघातून ते आमदार होते.
17) महाराष्ट्राचे सतरावे मुख्यमंत्री - माननीय नारायण राणे.
✓कार्यकाळ - 1फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999. नारायण राणे हे शिवसेना चे दुसरे मुख्यमंत्री झाले. तसेच ते मालवण या मतदार संघातून आमदार झाले.
Motivation
18) महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री - माननीय विलासराव देशमुख.
विलासराव देशमुख यांचे मूळ गाव बाभुळगाव , तालुका व जिल्हा लातूर आहे.
✓ कार्यकाळ - 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003. त्यांचा विधानसभा मतदार संघ हा लातूर होता. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आमदार होते.
List of all chief minister of maharashtra
19) महाराष्ट्राचे एकोणिसावे मुख्यमंत्री - माननीय सुशीलकुमार शिंदे.
✓ कार्यकाळ - 18 जानेवारी 2003 ते 30 ऑक्टोबर 2004.
सुशीलकुमार शिंदे यांचा मतदार संघ हा सोलापूर होता. ते काँग्रेस या पक्षातून मुख्यमंत्री झाले होते.
20) महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री - माननीय विलासराव देशमुख.
✓ कार्यकाळ - 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008. पुन्हा एकदा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले. त्यांचा मतदार संघ हा लातूर होता.
21) महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री - माननीय अशोक चव्हाण.
✓ कार्यकाळ - 4 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010. अशोक चव्हाण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आमदार होते. त्यांचा भोकर हा विधानसभा मतदार संघ होता.
22) महाराष्ट्राचे बाविसावे मुख्यमंत्री - माननीय पृथ्वीराज चव्हाण.
✓ कार्यकाळ - 11 नोव्हेंबर 2010 ते 26 सप्टेंबर 2014. पृथ्वीराज चव्हाण हे विधानपरिषदेचे आमदार होते. ते काँग्रेस पक्षात होते.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
विशेष - काही काळानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्या राष्ट्रपती राजवटीचा कार्यकाळ -
28 सप्टेंबर 2014 ते 30 ऑक्टोबर 2014
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
23) महाराष्ट्राचे तेविसावे मुख्यमंत्री - माननीय देवेंद्र फडणवीस.
✓ कार्यकाळ - 31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019. देवेंद्र फडणवीस हे भाजपा चे आमदार होते. तसेच नागपूर विधानसभा मतदार संघातून ते भाजपाचे पहिले मुख्यमंत्री झाले.
नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. राष्ट्रपती राजवटीची कार्यकाळ -
12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019.
त्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस , शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महविकास आघाडी चे सरकार आले.
24) महाराष्ट्राचे चोवीसावे मुख्यमंत्री - माननीय उध्दव साहेब ठाकरे.
✓ कार्यकाळ - 28 नोव्हेंबर 2019 ते 2022
पक्ष - शिवसेना.
25) महाराष्ट्राचे पंचविसावे मुख्यमंत्री - माननीय एकनाथ शिंदे.
✓ कार्यकाळ - ३० जून २०२२
पक्ष - भाजपा
Summary ( सारांश ) :
मित्रांनो अशा प्रकारे आपण आज ह्या पोस्ट मध्ये 1960 पासून ते आजपर्यंत सर्व माननीय मुख्यमंत्र्यांची कारकीर्द व कार्यकाळ (List of all chief minister of maharashtra) बघितला. हि महत्वपूर्ण अशी (महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री यादी) माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना share करा
धन्यवाद.................................