7th Pay Commission, नोव्हेंबर मध्ये चार महिने जोडून मिळणार मागील थकबाकी.
DA - DR मधे चांगली वाढ होणार
मित्रांनो सरकारी कर्मचऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी येक आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर च्या पेन्शन मुळे मागील चार महिन्यांची थकबाकी मिळणार आहे. व कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मधे वाढ होणार आहे.
तसेच केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई सवलतीचा म्हणजेच DR लाभ मिळू शकेल.
थकबाकी मिळेल - सातव्या वेतन आयोगात मिळणाऱ्या पगाराच्या आधारावर आधिकरी श्रेणी च्या वेतनात वाढ होणार आहे. पूर्वी मूळ वेतनावर 28 % DR नुसार रुपये मिळत होते.पण आता DR 3% वाढवल्यानंतर DR 31% झाला आहे.
DR ची गणना मूळ वेतनावर केली जाईल -
दिनांक 1 जुलै पासून महागाई भत्ता {DA} आणि महागाई मदत {DR} 31 टक्यांपर्यंत वाढवला आहे.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या थकबाकीचाही नोव्हेंबरमध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेय. हा अधिकृत निर्णय अद्याप जाहीर झाला नसला तरी लवकरच तो अपेक्षित आहे, असे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलेय. विशेष म्हणजे DR ची गणना मूळ वेतनावर केली जाते. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची पेन्शन 20,000 रुपये असेल तर त्याच्या पगारात 600 रुपयांची वाढ होईल. ही वाढ 3 टक्क्यांच्या वर्धित डीआरच्या आधारावर असेल.
गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमध्ये 3 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली होती. यापूर्वी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. अशा प्रकारे 28 टक्के उपलब्ध डीए 31 टक्क्यांवर पोहोचला. नवीन डीए वाढीमुळे 47.14 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल. नवीन महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमुळे सरकारी तिजोरीवर 9,488.70 कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे.
महागाई भत्ता कधीपासून वाढला - जुलै 2021 पासून डीएचा नवा दर लागू झाला आहे
नुकतीच मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे. कोविड महामारीमुळे पेन्शनधारकांसाठी DR आणि DA चे 3 हप्ते रोखून ठेवले होते. DA नेहमी कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनावर मोजला जातो. यानंतर ते पगाराच्या इतर घटकांसह मूळ पगारात जोडले जाते, ज्यामुळे कर्मचाऱ्याच्या एकूण पगारात आणखी वाढ होते.