Marathi suvichar | मराठी सुविचार marathi quotes

"आज आपण ह्या पोस्ट मध्ये काही महत्वपूर्ण सुविचार वाचूयात सुविचार म्हणजे चांगले विचार. चांगले विचार आपल्याला नक्कीच सकारात्मक जीवन जगण्यास मदत करतात. आपल्या जीवनात नेहमी आपण सकारात्मक राहील पाहिजे."
मराठी सुविचार marathi quotes



Marathi suvichar

1) गरुडाइतके उडता येत नाही,
    म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

2) विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,
    ते प्रत्येक गोष्ट ही वेगळेपणाने करतात.

3) मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा,
    दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

4) डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
    भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही.

5) विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर,
    कोणीतरी विचार केला पाहिजे.

6) स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका,
    त्यात तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

7) दुसऱ्यांना नावं ठेवण्याआधी,
     आपण कसे आहोत एकदा पहा.

8) जीवनात जगताना नेहमी सकारात्मक विचार करा,
    कारण सकारात्मक विचारानेच आपली प्रगती होते.

9) शरीराला आकार देणारा,
    कुंभार म्हणजे व्यायाम.👍 

10) अन्न हे पूर्णब्रह्म आहे, 
      त्याचा अनादर करू नका.

11) नवीन काहीतरी करण्यासाठी, 
      मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी. 😊☺️

12) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद हा अधिक असतो.👍

13) क्रांती हळूहळू घडते एका क्षणात नाही.

14) सावलीची किंमत जाणून घ्यायची,
      असेल तर सावलीतच जावे लागते.

15) यशाजवळ पोहचण्यासाठी कधीच शॉर्टकट नसतो.

मराठी सुविचार छोटे 


16) गरुडासारखे उंच उडायचे असेल,
      तर कावळ्यांची संगत सोडावी लागते.

17) सहानुभूती म्हणजे राक्षसच,
       ती देणाऱ्याचा अहंकार वाढवते
       तर घेणाऱ्यांची दुर्बलता.       - व.पू. काळे.

18) बोलणी फिसकटली की 
         मोडतो तो व्यवहार
              प्रेम नव्हे.      ☺️

20) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.

21) शिक्षण हे साधन आहे साध्य नव्हे.


मराठी सुविचार


22) विजेते जबाबदारी घेतात
       अपयशी इतरांना दोष देतात.       - ब्रिट हमी.

23) अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे
       स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत असतो.

24) शिक्षणावर केलेली गुंतवणूक उत्तम 
      व्याज मिळवून देते.                

25) आपल्या सर्वांकडे समान कौशल्य नाही,
       पण ते कौशल्य विकसित करण्याची 
       समान संधी मात्र आहे -     रतन टाटा.

26) तुम्हाला पुढे जाता येत नसेल तर पुढे जाऊ नका,
       पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.

27) संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा 
       सर्वात महत्वाचा घटक आहे. 

28) ज्या कर्तव्यात हृदयाचा जिव्हाळा नाही
       ते कर्तव्य किती चांगल्या प्रकारे केले तरी
       जगाला जिंकू शकणार नाही.         

Marathi quotes

29) शहाणा माणूस नेहमी एकटा असतो आणि
      दुर्बल व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसून येतो.

30) यशाची गुरुकिल्ली म्हणजे
       सकारात्मक विचार.👍👍👍👍👍👍👍👍👍

31) आयुष्यात नेहमी छोट्या छोट्या गोष्टीत 
       आनंदी राहायला शिका.

32) बोलताना शब्दांची उंची वाढवा
      आवाजाची उंची नव्हे.👍☺️

33) विश्वास हा खोडरबरसारखा असतो तुम्ही
      केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

34) शरीर पाण्यामुळे
       मन सत्यामुळे आणि
       आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो.☺️

35) रिकामे डोके राक्षसाचे घर असते.

36) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे 
                        पुस्तक.

 Quotes in marathi 


37) मित्रांनो वेळेची किंमत 
       करायला शिका 
       पैसे कधीच कमी पडणार नाही.

38) आपला आत्मविश्वास आपली 
       प्रगती निश्चित करू शकतो.

39) अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

40) विद्या विनयेन शोभते.

41) गरज ही ज्ञानाची जननी आहे.

42) प्रेमाने जग जिंकता येते.


Marathi motivational quotes 

43) कपटी मित्रापेक्षा 
       दिलदार शत्रू बरा.

44) सदाचारी माणसे नेहमी निर्भय असतात.

45) ध्येयाचा ध्यास लाभला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.

46) पुरुष वंशाचा दिवा असेल तर 
      स्त्री त्या दिव्यातील ज्योत होय.

47) क्षमा करणे म्हणजे शत्रूला जिंकणे.
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

48) कर्तृत्व हा जीवनाचा आत्मा आहे.

49) स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे

      हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे.


50) स्वतःला सतत सुधारण्यात गुंतवून ठेवा.

51) जगण्यात जिंकण्यापेक्षा जिंकत राहण्याचा प्रयत्न महत्त्वाचा असतो.

52) स्वतःवर विश्वास ठेवणारी माणसं कधीही हरत नाहीत.

53) यशाची भूक असेल तर अपयशाची भीती मनातून काढून टाका.

54) वेळ आणि शब्द हे पुन्हा परत येत नाहीत—त्यांचा वापर जपून करा.

55) स्वप्नं मोठी पाहा, पण त्यांच्यासाठी झोप मोडण्याची तयारी ठेवा.

56) सकारात्मक विचारच आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात.

57) जीवनात कुणावर रागवत बसू नका; वेळ कमी आहे, नाती मौल्यवान आहेत.

58)मन जिंकलं की जग जिंकलं.

59) हसणं म्हणजे जीवनाकडे बघण्याची सुंदर पद्धत आहे.

60) अपयश हेच यशाकडे जाणारे पाऊल असते.


छोटे सुविचार मराठी

👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद 
आमच्या इतरही पोस्ट वाचा