पशुसंवर्धन विभाग सामान्य ज्ञान प्रश्नसंच
General knowledge questions in marathi : नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण पशुसंवर्धन विभाग याच्याशी संबधित सामान्य ज्ञानाचे प्रश्न वाचणार आहोत. ह्या पोस्ट मधे पशुसंवर्धन ह्या टॉपिक वर जास्त प्रश्न आहेत. व ते सर्व प्रश्न तुम्ही पाठ करावे व त्याचा अभ्यास करावा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
| पशुसंवर्धन परिचर सामान्य ज्ञान |
(General knowledge questions in marathi)
तुम्ही जर पशुसंवर्धन विभागातील supervisor, परिचर , ह्या पदासाठी फॉर्म भरला असेल तर हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे
तसेच इतर वाचकांच्या ज्ञानात भर पडावी असेही प्रश्न ह्या पोस्ट मधे आहे
25 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी
1) जगातील पशुधनात भारताचा वाटा किती टक्के आहे ?
उत्तर - 17 टक्के
2) महाराष्ट्रात आढळणारी ......... या जातीची शेळी मांसासाठी तसेच दुधासाठीही उपयुक्त गणली जाते ?
उत्तर - उस्मानाबादी.
3) पशुधनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?
उत्तर - सहावा.
4) जास्त पावसाच्या प्रदेशात शेतीसाठी कोणत्या जातीचा बैल उपयुक्त आहे ?
उत्तर - डांगी बैल.
5) दुभत्या जनावारांसाठी कोणता वाळलेला चारा अधिक पोषक आहे ?
उत्तर - ज्वारीचा कडबा.
6) पुढीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात घृतांश म्हणजे Fats चे प्रमाण जास्त असते ?
उत्तर - म्हैस.
7) खाद्याचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता पुढीलपैकी कोणत्या जनावरांत जास्त असते ?
उत्तर - गाय.
8) दुधाचा महापूर ( Operation Flood ) ही योजना भारतात प्रथम केव्हा सुरू झाली ?
उत्तर - 1971.
9) जनावरांच्या पोटातील कोणत्या भागास 'आंबवण पिंप' असे म्हणतात ?
उत्तर - रोमंथिका.
10) गीर गायीचे मूळ स्थान कोणते आहे ?
उत्तर - जुनागढ जिल्हा ( गुजरात राज्य ).
11) संकरित गाय सरासरीने देशी गायीच्या किती पट जास्त दूध देऊ शकते ?
उत्तर - चौपट.
12) बैलगाड्यांच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी कोणत्या जातीच्या बैलाची निवड कराल ?
उत्तर - खिलार.
13) परदेशी गाय सरासरीने एका वितात किती दूध देतात ?
उत्तर - 4000 लीटर.
14) गाभण गाईस रोजच्या खाद्यात खुराकाचे ( आंबवण ) प्रमाण साधारणपणे किती असावे ?
उत्तर - एक ते दीड किलो.
15) खालीलपैकी ..... या जातीची गाय सर्वाधिक दूध देते ?
अ) जर्सी
ब) साहिवाल
क) गीर
ड) होलस्टीन फ्रिजिअन
उत्तर - होलस्टिन फ्रिजिअन.
16) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेली तिहेरी संकरित गाय तयार करताना होलस्टिन - फ्रिजिअन व जर्सी या विदेशी जातींचा, तर ........ या देशी जातीचा उपयोग केला आहे ?
उत्तर - गीर गाय.
17) आहारशास्त्रानुसार माणसाच्या दररोजच्या आहारात दुधाचे प्रणाम किती असणे गरजेचे आहे ?
उत्तर - 220 ग्रॅम.
18) पुढीलपैकी कोणते गवत गायरानासाठी जास्त उपयुक्त आहे ?
अ) मारवेल
ब) अंजन
क) सुबाभूळ
ड) कुसळी गवत
उत्तर - मारवेल.
19) संकरित गायींचा भाकड काळ साधारणपणे ....... इतका असतो ?
उत्तर - 100 दिवस.
20) शेळ्यांना पुढीलपैकी कोणते हवामान चांगले मानवते ?
अ) उष्ण व कोरडे
ब) उष्ण व दमट
क) थंड व दमट
ड) थंड व कोरडे
उत्तर - उष्ण व कोरडे.
21) महाराष्ट्रात एका मेंढीपासून सरासरी किती लोकर मिळते ?
उत्तर - अर्धा ते एक किलो.
मराठी सामान्य ज्ञान
22) मेरिनो व दख्खनी या कोणत्या प्राण्यांच्या जाती आहे ?
उत्तर - मेंढी.
23) सर्वसाधारणपणे शेळी वर्षात किती वेळा विते ?
उत्तर - दोन.
24) संकरित कोंबड्या वर्षाला किती अंडी देतात ?
उत्तर - 240 ते 260.
25) गावठी जातीच्या कोंबडया वर्षाला किती अंडी देतात ?
उत्तर - 60 ते 80.
26) कोंबड्यांच्या विष्टेपासून तयार करण्यात आलेले खत ....... या वर्गात मोडते?
उत्तर - सेंद्रिय खत.
27) भारतात म्हशींची सर्वाधिक संख्या पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर - उत्तर प्रदेश राज्य.
28) 'हरितक्रांती' चा संबंध कशाशी आहे?
उत्तर - पीक उत्पादनाशी.
29) श्वेतक्रांतीचा संबंध कशाशी आहे ?
उत्तर - दूध उत्पादनाशी.
पशुसंवर्धन परिचर प्रश्न
30) पशुधनाची संख्या लक्षात घेता जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
उत्तर - पहिला.
31) व्ही. कुरियन यांचे नाव कशाशी संबंधित आहे ?
उत्तर - धवलक्रांती.
32) दुधाचा सामू सामान्यपणे ......... इतका असतो ?
उत्तर - 6.2 ते 6.6
33) दुधातील स्निग्धांश कोणत्या साधनाने मोजला जातो ?
उत्तर - ब्युट्रोमीटर.
34) दुधातील स्निग्धांश काढून घेण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जातो ?
उत्तर - सेंट्रीफ्युगल मशीन.
35) अंड्यांमध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण किती असते ?
उत्तर - 0
36) गाईच्या ताज्या दुधाचे विशिष्ट गुरुत्व म्हणजेच Specific Gravity किती असते ?
उत्तर - 1.028.
37) पुढीलपैकी कोणत्या प्राण्याच्या दुधात 'स्निग्धांशा' चे प्रमाण सर्वात जास्त असते ?
अ) गाय
ब) मेंढी
क) शेळी
ड) म्हैस
उत्तर - मेंढी.
38) दुग्धज्वर म्हणजेच Milk Fever हा रोग रक्तातील पुढीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो ?
अ) फॉस्फरस
ब) मॅग्नेशिअम
क) कॅल्शिअम
ड) पोटॅश
उत्तर - कॅल्शिअम.
39) रजतक्रांती ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?
उत्तर - अंडी व कोंबड्या उत्पादनवृद्धी.
40) राज्यातील पशुधनाची घनता किती आहे ?
उत्तर - 187.
टीप - पशुधनाची घनता म्हणजे - दर 100 हेक्टर पिकाखालील क्षेत्रामागील जनावरांची संख्या.
41) भारतातील दूध उत्पादनात म्हशींच्या दुधाचा वाटा किती आहे ?
उत्तर - 52 ते 55 टक्के.
42) म्हशींचा गर्भावधी म्हणजेच (Gestation Period) ....... किती दिवसांचा असतो ?
उत्तर - 300 दिवस.
43) गाईचा गर्भावधी ( Gestation Period ) ..... किती दिवसांचा असतो ?
उत्तर - 280 दिवस.
44) यवतमाळ जिल्ह्यात .......... येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत ?
उत्तर - वणी.
45) यवतमाळ जिल्ह्यास ........... सोने पिकविणारा जिल्हा म्हणून ओळखले जाते ?
उत्तर - पांढरे सोने.
46) मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - नागपूर जिल्हा.
47) नागपूर जिल्ह्यातील 'कन्हान' हे ठिकाण कोणत्या उद्योगाशी निगडित आहे ?
उत्तर - कागद उद्योग.
48) 'सारगासो' समुद्र खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर - अटलांटिक महासागर.
49) विषुववृत्त म्हणजे .......... अंशांचे अक्षवृत्त होय ?
उत्तर - 0
50) दोन समोरासमोरील रेखावृत्ते मिळून ......... तयार होते ?
उत्तर - बृहदवृत्त.
51) कोणते सर्वात मोठे अक्षवृत्त आहे ?
उत्तर - विषुववृत्त.
52) हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो ?
उत्तर - 76.
53) रेखावृत्ते ......... असतात ?
उत्तर - अर्धवर्तुळाकार.
54) चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात ?
उत्तर - 27.33
55) सूर्य हा कोणत्या वायूंपासून बनलेला आहे ?
उत्तर - हायड्रोजन व हेलियम.
56) पृथ्वीचे सुर्यापासूनचे अंतर किती आहे ?
उत्तर - 14,96,00,000 कि. मी.
57) प्रकाशाचा प्रतिसेकंद वेग किती आहे ?
उत्तर - 2,99,792 कि. मी.
58) पृथ्वीला सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता ?
उत्तर - शुक्र.
59) सूर्याला सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता आहे ?
उत्तर - बुध.
60) आपला भारत देश .......... या प्रकारच्या प्रदेशात मोडतो ?
उत्तर - मोसमी हवामानाचा प्रदेश.
61) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
उत्तर - नाईल नदी.
62) जगातील सर्वात लांब नदी नाईल ही कोणत्या देशातून वाहते ?
उत्तर - इजिप्त.
63) कोणत्या प्रदेशात सह महिने रात्र व सहा महिने दिवस असतो ?
उत्तर - टुंड्रा ( ध्रुवीय ) प्रदेश.
64) पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास साधारणतः किती दिवस लागतात ?
उत्तर - 365.24 दिवस.
65) चंद्रावरून आकाश कोणत्या रंगाचे दिसते ?
उत्तर - काळ्या.
66) कोणते राज्य मिठाच्या उत्पादनात देशात आघाडीवर आहे ?
उत्तर - गुजरात.
67) गव्हामध्ये कोणते प्रथिन असते ?
उत्तर - ग्लुटेनिन.
68) अमरवेल ही वनस्पती .............. आहे ?
उत्तर - परजीवी.
69) ग्रामपंचायत सदस्यांना काय संबोधले जाते ?
उत्तर - पंच.
70) वैदिक काळात गावाच्या प्रमुखास काय म्हणत असे ?
उत्तर - ग्रामीणी.
71) सर्वात धिप्पाड अंगाची, मोहक सवाई चालीची गुजरातमधील गाय कोणती ?
उत्तर - कांक्रेज.
72) भारतातील सर्वात मोठे धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर - भागेरथी.
73) महात्मा गांधींचे भारतातील पाहिले चरित्र कोणी लिहले?
उत्तर - अवंतीकबाई.
74) सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव कोणते आहे ?
उत्तर - नायगाव.
75)............ ही भारतातील सर्वात लहान आदिवासी जमात आहे ?
उत्तर - अंदमानी.
76) बलुत ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
उत्तर - दया पवार.
77) तंबाखूमध्ये असणारा विषारी घटक कोणता आहे ?
उत्तर - निकोटिन.
78) भारतात पशूंची उत्पादकता कमी असण्याच्या कारणांमध्ये पुढीलपैकी कोणते कारण अधिक महत्वाचे आहे ?
उत्तर - निरुपयोगी जनावरांची मोठी संख्या.
79) एक शेळी वर्षाला साधारणपणे किती किलो लेंडीखत देते?
उत्तर - 200 किलो.
80) अपारंपरिक पद्धतीने रेशीम उत्पादन करणाऱ्या राज्यामध्ये .......... हे राज्य देशात अग्रेसर आहे ?
उत्तर - महाराष्ट्र.
81) जसजसा अक्षांश वाढतो तसतशी अक्षवृत्तांची लांबी ...... होत जाते ?
उत्तर - कमी.
82) गुरुकुल ही शिक्षणसंस्था कोणी स्थापन केली ?
उत्तर - स्वामी श्रध्दानंद.
83) राष्ट्रसभेची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाइसरॉय कोण होते ?
उत्तर - लॉर्ड डफरिन.
84) आझाद हिंद सेने चे अध्यक्ष व सरसेनापती कोण होते ?
उत्तर - सुभाषचंद्र बोस.
85) आझाद हिंद सेने ने ब्रह्मदेशमार्गे ......... पर्यंत धडक मारली होती ?
उत्तर - इंफाळ.
87) न्यू इंडिया हे वर्तमानपत्र कोण चालवीत असे?
उत्तर - बिपिनचंद्र पाल.
88) बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती ?
उत्तर - सर विल्यम वार्ड.
89) 'समाजवादच का' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
उत्तर - जयप्रकाश नारायण.
90) महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात प्रतिसारकरची स्थापना कोणी केली?
उत्तर - क्रांतिसिंह नाना पाटील.
91) कोणाला सरहद्द गांधी म्हणून ओळखले जायचे ?
उत्तर - खान अब्दुल गफारखान.
92) भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने कधी संमत केला ?
उत्तर - 18 जुलै 1947.
93) गांधीजींशी वैचारिक मतभेद झाल्यानंतर कोणत्या पुरोगामी विचारांच्या क्रांतिकारक नेतृत्वाने फॉरवर्ड ब्लॉक हा नवा पक्ष स्थापन केला ?
उत्तर -सुभाषचंद्र बोस.
94) भारत देश कधी स्वतंत्र झाला ?
उत्तर - 15 ऑगस्ट 1947.
95) भारत स्वतंत्र झाला त्या वेळी महात्मा गांधी कोठे होते ?
उत्तर - नौखोली ( बांगलादेश )
96) हैदराबादमधील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता ?
उत्तर - कासीम रझवी.
97) हैदराबादच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर - स्वामी रामानंदतीर्थ.
98) कोणत्या वायूस हसविणारा वायू म्हणतात ?
उत्तर - नायट्रस ऑक्साइड.
99) ठसका आणणारा वास कोणत्या वायूस येतो ?
उत्तर - सल्फर डाय ऑक्साइड.
100) इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या ........... चे उदाहरण आहे ?
उत्तर - अपस्करण.