देशात का छापली गेली होती झिरो ची नोट
Why Zero note was printed in the country :
मित्रांनो स्वागत आहे तुमचे ह्या ब्लॉग मध्ये, आज आपण खूप वेगळ्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे आपल्या भारत देशात का छापली होती झिरो ची नोट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की झीरो ची पण नोट छापली गेली होती. हो मित्रांनो झीरोची पण नोट छापण्यात आली होती. आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
(Why Zero note was printed in the country marathi)
| Why Zero note was printed in the country marathi |
झिरो ची नोट आता आपल्या जशा 100 रुपये , 200 रुपये, 500 रुपये , 2000 रुपये अशा नोटा आहेत तशीच झिरो ची नोट होती.
देशात का छापली गेली होती झिरो ची नोट Why Zero note was printed in the country
तुम्ही यापूर्वी 1 रुपयांपासून ते अगदी 2000 रुपयांपर्यंत नोटा बघितल्या आहेत.
तसेच ह्या नोटा भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून छापण्यात येतात. व ह्या सर्व नोटांचा आपण दैनंदिन जीवनात आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी उपयोग करत असतो.
पण आम्ही आज तुम्हाला ऐका अशा नोटेबाबत सांगणार आहे ते वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
आता प्रश्न हा आहे की का छापली होती झीरो ची नोट.
तर ह्या नोटा भ्रष्टाचार मोहिमेच्या अंतर्गत छापण्यात आल्या होत्या.
ही नोट
1) झीरो ची नोट आताच्या जशा नोटा आहेत तशाच होत्या
2) ह्या नोटेवर महात्मा गांधी चा फोटो ही होता.
3) सांगायचे झाले तर ही नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने छापल्या नव्हत्या.
4) तर मग ह्या नोटांचा वापर तरी कशासाठी केला होता?
हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल?
या झीरो च्या नोटा छापण्याची कल्पना दक्षिण भारतातील एका NGO ची होती. आता NGO म्हणजे काय?
NGO full form in marathi - non government organization
Ngo ही एक स्वयंसेवी संस्था आहे. ही संस्था कोणताही नफा न पाहता समाज सेवा करते. तसेच ही संस्था खाजगी स्वरूपात काम करत असते.
तामिळनाडू मध्ये काम करणाऱ्या या NGO ने साधारण 5 लाख झिरो रुपयांच्या नोटा छापल्या होत्या. या नोटा छापण्याचा उद्देश असा होता की, 2007 मध्ये भ्रष्टाचाराविरोधात या नोटा छापण्यात आल्या होत्या.
या नोटांवर भ्रष्टाचाराविरोधात संदेश ( messages ) लिहण्यात आले होते. या नोटांवर चार भाषांमध्ये संदेश लिहण्यात आला होता त्या चार भाषा होत्या तेलगू , कन्नड , हिंदी , मल्याळम आणि या नोटा लोकांमध्ये वाटण्यात आल्या होत्या.
या नोटांवर लिहल होत की
' भ्रष्टाचार संपवा ' जर कुणी लाच मागितली तर त्याला ही नोट द्यावी आणि झालेली घटना आम्हाला सांगा. लाच न देण्याची आणि लाच न घेण्याची शपथ घेऊया. तसेच या नोटांवर महात्मा गांधी यांच्या फोटोखाली ngo चा फोन नंबर आणि ई-मेल id दिला होता.
ही नोट NGO च तयार करत असे व लाच मागणाऱ्या लोकांना देत असे.
निष्कर्ष - मित्रांनो आज आपण ह्या पोस्ट मधून शिकलो की लाच घेऊ नये आणि लाच देऊ नये.
ह्याही पोस्ट वाचयला नक्की आवडतील -