gk questions in marathi with answers

 

नमस्कार विद्यार्थ्यांनो आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण पोलीस भरती साठी विचारले जाणारे मराठी सामान्य ज्ञान , general knowledge in marathi, मराठी gk ह्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. आपण जितके प्रश्न सोडवाल तितका आपल्याला परीक्षेत फायदा होणार. 

 gk questions in marathi with answers

1) कोळशाच्या खाणी व सिमेंट कारखाना यामुळे प्रसिद्धी असलेले वर्धा नदीकाठचे ' घुगुस ' हे गाव .......... जिल्ह्यात आहे ?

उत्तर - चंद्रपूर.

2) चंद्रपूर जिल्ह्यातील ............. ही इमारती लाकडाची देशातील एक महत्वाची बाजारपेठ गणली जाते ? 

उत्तर - बल्लारपूर.

3) महाराष्ट्र राज्यात नागपूर जिल्ह्यात 'काटोल' येथे ............ या फळांचे संशोधन केंद्र आहे.

उत्तर - लिंबू फळ.

4) पैनगंगा नदीवर यवतमाळ जिल्ह्यात कोठे धरण बांधण्यात आले आहे ?

उत्तर - इसापूर.


सामान्य ज्ञान मराठी 

5) महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे ?

उत्तर - रामटेक.

6) ईशान्य मोसमी वारे ............ या कालावधीत वाहतात.

उत्तर - नोव्हेंबर ते फेब्रुवारी.

7) ' माऊंट सारामती ' हे शिखर कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर - नागालँड राज्य.

8) कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले 'टिटाघर' कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर - पश्चिम बंगाल राज्य.

9) दगडी कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले  'राणीगंज' हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसले आहे ?

उत्तर - दामोदर खोरे.

10) कोणत्या खडकापासून 'रेगुर' ही काळी- कसदार माती निर्माण झाली ? 

उत्तर - बेसॉल्ट खडक.

11) मीनाक्षी मंदिरामुळे प्रसिध्द असलेले मदुराई कोणत्या राज्यात आहे ? 

उत्तर - तमिळनाडू.

12) 'ऐजवाल' ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ?

उत्तर - मिझोराम राज्य.

13) ' तवा नदी ' ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ?

उत्तर - नर्मदा नदी.

14) रावी नदीवर उभारण्यात आलेला 'थेन प्रकल्प' खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर - पंजाब राज्य.

15) 'सायलेंट व्हॅली' प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ? 

उत्तर - केरळ राज्य.

16) खालीलपैकी अतिपूर्वेकडील राज्य कोणते ? 

उत्तर - अरुणाचल प्रदेश.

17) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ?

उत्तर - कार्बेट नॅशनल पार्क.

18) ' तेलंगणाचे पठार ' कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर - तेलंगणा

19) ......….......... याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला.

उत्तर - लॉर्ड मेकॉले. 

20) कोणाला 'आद्य क्रांतिकारक' असे म्हटले जाते ?

उत्तर - वासुदेव बळवंत फडके.


Summary ( सारांश ) - आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण मराठी gk च्या प्रश्नांचा सराव केला आहे.