पोलीस भरती सराव प्रश्नसंच 3 police bharti sarav prashnanch in marathi
पोलिस भरती सामान्य ज्ञान
1) कुकडी योजनेचा फायदा ......... या दोन जिल्ह्यांना मिळतो
उत्तर - पुणे व अहमदनगर.
2) "डेक्कन क्वीन' ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते ?
उत्तर - पुणे व मुंबई
3) महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते आहे ?
उत्तर - गोंदिया , गडचिरोली.
4) जेथे शेतजमीन पाण्यापेक्षा उच्च पातळीवर असते तेथे खालीलपैकी कोणत्या जलसिंचन पद्धतीचा वापर सुयोग्य ठरेल ?
उत्तर - उपसा जलसिंचन.
5) महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीत एकूण किती जिल्हे आहेत ?
उत्तर - सात.
6) महाराष्ट्रात समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव काय ?
सुंद्री वनस्पती.
7) कोकणात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आढळते ?
उत्तर - समांतर जलप्रणाली.
8) ................. नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाचा जलाशय ' लक्ष्मीसगर ' नावाने ओळखला जातो.
उत्तर - भोगावती नदी.
9) वर्धा नदीला मिळणारी सर्वात मोठी उपनदी कोणती ?
उत्तर - पैनगंगा नदी.
10) वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन कोणते ?
उत्तर - दगडी कोळसा.
11) महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे ?
उत्तर - सिंधुदुर्ग जिल्हा.
12) देवगड, मालवण, व वेंगुर्ले ही बंदरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - सिंधुदुर्ग जिल्हा.
13) राजगड कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - पुणे जिल्हा.
14) देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी ( पुणे ) येथे कार्यान्वित आहे. उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी ( पुणे ) हे केव्हापासून कार्यान्वित आहे ?
उत्तर - 1971.
15) फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - पुणे जिल्हा.
16) छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले 'वढू' हे ठिकाण पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ?
उत्तर - शिरूर तालुका.
17) देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे 'गंगापूर' धरण खालीपैकी कोणत्या शहराजवळ आहे ?
उत्तर - नाशिक शहर.👍👌
18) 'निळवंडे' धरण ........…...... या जिल्ह्यात बांधण्यात आले आहे.👍
उत्तर - अहमदनगर जिल्हा.
19) महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात कोठे आहे ?
उत्तर - राहुरी.
20) साध्वी अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेले 'चोंडी' हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - अहमदनगर जिल्हा.👍👌