Marathi general knowledge mpsc answer

    


नमस्कार मित्रांनो आज आपण सरळसेवा भरती ला विचारले जाणारे मराठी सामान्य ज्ञान प्रश्न बघणार आहोत. Marathi Gk Questions हे तुम्हाला शिपाई, क्लर्क , कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक , तसेच क्लास 1 ते क्लास 4 या पदांसाठी परीक्षेत हे प्रश्न विचारले जातात. 

general knowledge questions and answers in marathi for mpsc

Gk in Marathi


1) बाळ गंगाधर टिळक यांनी सुरु केलेल्या प्रथम वृत्तपत्राचे नाव काय होते?
उत्तर - केसरी.

2) पानिपत चे तिसरे युद्ध कुणामध्ये झाले?
उत्तर - मराठा आणि अफगाण.

3) खालीलपौकी कोणता महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे ?
उत्तर - राष्टीय महामार्ग NH- 44.

4) भारत शेजारील कोणत्या देशाने नो मास्क नो सर्व्हिस धोरण प्रथम अमलात आणले?
उत्तर - बांगलादेश.

5) भारताने कोणत्या देशा बरोबर BECA करार केला आहे?
उत्तर - युनाइटेड स्टेट.

6) नाबार्ड या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली?
उत्तर - १२ जुलै १९८२.

7) भारतातील रबर उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे ?
उत्तर - केरळ.

8) कोणत्या व्हाइसरॉयने स्थानिक प्रेस कायदा (Vernacular Press Act ) आणि 1878 चा शस्त्र कायदा पास केला?
उत्तर - लॉर्ड लिटन.

9) कोणार्क येथे …… हे प्रसिद्ध मंदिर आहे.
उत्तर - सूर्य मंदीर 

10) करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या राज्याने टीम - ११ नावाच्या आंतरविभागीय समितीची स्थापना केली होती?
उत्तर - उत्तर प्रदेश.

मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच


11) सातारा जिल्ह्यातील कोणता आधुनिक साखर कारखाना १९३३ मध्ये स्थापन झाला?
उत्तर - फलटण शुगर वर्क्स.


12) महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही?

 A. गुलामगिरी

 B. ज्योतिनिबंध

 C. शिवाजीचा पोवाडा

 D. सत्यधर्मप्रकाश
उत्तर - ज्योतिनिबंध.

13) भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय कोणत्या शहरामध्ये आहे?
उत्तर - औंध.

14) भारताचे सरन्यायाधीश न्या. जगदिशसिंह खेहर यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी कोणत्या राज्यातील उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केले?
उत्तर - उत्तराखंड व कर्नाटक.

15) कोकणात कोणती वने आढळतात ?
उत्तर - उष्ण कटिबंधिय सदाहरित.

16) जगातला सर्वात मोठा खंड कोणता आहे ?
उत्तर - आशिया.

17) बटाटा हे .................... आहे ?
उत्तर - खोड.

18) जगातील सर्वांत मोठा महासागर कोणता आहे ?उत्तर - पॅसिफिक महासागर.

19) सर्वांत मोठे वाळवंट ?
उत्तर - सहारा (आफ्रिका).

20) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण?
उत्तर - ह ना आपटे.