पोलीस भरती सामान्य ज्ञान मराठी प्रश्न
नमस्कार मित्रांनो आज आपण ( Police Bharti Sarav Prashnsanch ) पोलीस भरती सराव प्रश्नसंच 2 बघणार आहोत. हा संभाव्य प्रश्नसंच तुम्हाला आगामी होणाऱ्या पोलीस भरती परीक्षेसाठी तसेच इतर परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जिल्हा परिषद भरती, पाटबंधारे विभाग भरती, शिक्षक भरती, जलसंपदा विभाग भरती, पशुसंवर्धन परिचर भरती , अशा अनेक सरळसेवा भरती साठी हा 50 प्रश्नांचा प्रश्नसंच तुम्ही वाचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
Police Bharti Sarav Prashnasanch
Police bharti sarav prashnsanch 2
1) ' महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?
उत्तर - मुंबई.
2) मुंबई येथील शेअरबाजार खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झाला ?
उत्तर - 1877.
3) मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारी ' तानसा ' व
' वैतरणा ' ( मोडकसागर ) हे जलाशय या जिल्ह्यात आहे .........
उत्तर - ठाणे.
4) पालघर जिल्ह्यातील ........... येथील भुईकोट किल्ला 1739 मध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला.
उत्तर - वसई.
5) वसई, अर्नाळा हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर - पालघर.
6) महाराष्ट्र राज्यात ............ येथे दुग्ध व्यवसायातील दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
उत्तर - दापचरी ( पालघर ).
7) भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे ?
उत्तर - मुंबई बंदर.
8) जगाला मानव धर्म शिकविणारे मातृहृदयी कवी सानेगुरुजी यांचे ' पालगड ' हे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - रत्नागिरी जिल्हा.
9) ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कोठे आहे ?
उत्तर - रत्नागिरी.
10) हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावर आहे ?
उत्तर - रत्नागिरी.
11) रायगड जिल्ह्यात ........ येथे भात संशोधन केंद्र आहे.
उत्तर - कर्जत.
12) हिंदुस्थान कॉपर लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील तांबे उत्पादक निगमाचा प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आहे ?
उत्तर - तळोजा ( रायगड जिल्हा ).
13) रायगड किल्ला ........ या नदीकाठी ' पाचाड ' येथे वसला आहे.
उत्तर - सरस्वती नदी.
14) ' शिवथरघळ ' येथे समर्थ रामदासांनी आपला ' दासबोध ' ग्रंथ लिहिला, असे म्हंटले जाते. शिवथरघळ रायगड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ?
उत्तर - महाड तालुका.
15) ' फोंडा ' व ' आंबोली ' या घाटातून कोकणात ............ या जिल्ह्यात उतरता येते.
उत्तर - सिंधुदुर्ग जिल्हा.
16) शिवकालीन ' रांगणा ' हा इतिहासप्रसिध्द किल्ला खालीलपैकी कोठे वसला आहे ?
उत्तर - तालुका - कुडाळ, जिल्हा - सिंधुदर्ग.
17) ' सुवर्णदुर्ग ' हा जलदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात.......…. येथे आहे.
उत्तर - हर्णे.
Police Bharti Marathi Gk Questions
18) शिवगड , मनोहरगड हे डोंगरी किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर - सिंधुदुर्ग जिल्हा.
19) समर्थ रामदासांची समाधी कोठे आहे ?
उत्तर - सज्जनगड.
20) सातारा जिल्ह्यातून चिपळूणला जाण्यासाठी ....... घाट उतरावा लागतो.
उत्तर - कुंभार्ली घाट.
Police bharti gk Questions in marathi
21) खालीलपैकी कोणते पठार ' टेबल ' land म्हणून ओळखले जाते ?
उत्तर - पाचगणी पठार.
22) सांगली जिल्ह्यातील ' सागरेश्वर ' हे अभयारण्य ....... साठी राखीव आहे.
उत्तर - हरणे.
23) कोणत्या जिल्ह्यास यथार्थतेने ' नाट्यपंढरी ' म्हणून ओळखले जाते.
उत्तर - सांगली जिल्ह्यास नाट्यपंढरी म्हणून ओळखले जाते.
24) हळदीच्या उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?
उत्तर - सांगली जिल्हा हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
25) चालुक्यकाळी बीड शहराचे नाव .......... होते, असे म्हंटले जाते.
उत्तर - चालुक्यकाळी बीड शहराचे नाव चंपावतीनगर होते.
26) सैबेरियाच्या पूर्व किनाऱ्याजवळून ............. हा थंड पाण्याचा प्रवाह वाहतो.
उत्तर - क्यूराइल.
27) आईसलंडमधील ज्वालामुखी कोणत्या नावाने ओळखला जातो ?
उत्तर - हेक्ला.
28) महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या कोणत्या ग्रंथांमधून तथाकथित उच्चवर्णीयांकडून शूद्रातिशूद्रांची कशा प्रकारे पिळवणूक केली जाते, याचे विदारक दर्शन घडविले ?
उत्तर - ब्राम्हणांचे कसब व गुलामगिरी ग्रंथ.
29) विधवा विवाहाला धार्मिक अधिष्ठान लाभावे म्हणून करवीर व संकेश्वराच्या कोणत्या शंकराचार्यांकडे दाद मागितली ?
उत्तर - विष्णुशास्त्री पंडित.
30) गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना साध्या व सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहला ?
उत्तर - ग्रामगीता ग्रंथ.
31)' स्त्री - धर्मनीती ' या सुप्रसिद्ध ग्रंथाचे लेखन ..... यांनी केले आहे.
उत्तर - पंडिता रमाबाई.
32) ' मुंबईचा सिंह ' म्हणून कोणाला ओळखले जाई ?
उत्तर - फिरोजशहा मेहता.
33) दादोबा पांडुरंग यांनी मुंबई येथे ' परमहंस सभे ' ची स्थापना कधी केली ?
उत्तर - इ. स. 1850.
34) छातीच्या पिंजऱ्यातील बरगड्यांच्या बारा जोड्यांपैकी वरच्या किती जोड्या छातीच्या हाडाला जोडलेल्या असतात ?
उत्तर - सात जोड्या.
35) हवेत असलेल्या पाण्याच्या सूक्ष्म कणांना ........... अशी संज्ञा आहे.
उत्तर - अइरसोल.
36) संगणकातील ' चीप ' हा भाग कोणते कार्य करतो ?
उत्तर - विद्युत प्रवाहाचा पुरवठा.
37) महासंगणकाचा वेग कशामध्ये मोजतात ?
उत्तर - नॅनोसेकंद.
38) संगणकाच्या परिभाषेत चित्रातील ऐका ठीपक्यास ............. असे म्हणतात.
उत्तर - पिक्सेल.
39) व्यक्तीचे वय वाढते तसा व्यक्तीचा रक्तदाब ..........
उत्तर - रक्तदाब वाढतो.
40) खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनविण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर - भंडारा.
41) महाराष्ट्रात ......... या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात.
उत्तर - चंद्रपूर जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात.
42) ' महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ( MELTRON ) चे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर - मुंबई.
43) मुंबई उपनगरातून जाणाऱ्या ........... महामार्गास ' वसंतराव नाईक महामार्ग ' म्हणून ओळखले जाते.
उत्तर - पूर्व द्रुतगती महामार्ग ( ईस्टर्न एक्सप्रेस highway )
44) मुशी जातीचे गवत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळते ?
उत्तर - ठाणे व पालघर.
45) अनेक थोर व्यक्तींना जन्म देणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यास .........…...... म्हणूनच ओळखले जाते.
उत्तर - रत्नभूमी.
46) महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव कोणते ?
उत्तर - शेरवली.
47) रंकाळा तलाव कोठे आहे ?
उत्तर - कोल्हापूर.
48) देशातील पहिली सहकारी सूत गिरणी कोठे आहे ?
उत्तर - कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी.
49) राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?
उत्तर - भोगावती नदी.
50) भोगावती नदीवर बांधण्यात आलेले राधानगरी हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - कोल्हापूर जिल्हा.
SUMMARY ( सारांश ) - मित्रांनो आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण Police bharti sarav prashnsanch 2 (पोलीस भरती सराव प्रश्नसंच 2) बघितले आहे हे प्रश्न तुम्हाला सरळसेवा भरती साठी महत्वाचे आहे.
FAQ - नेहमी विचारले जाणारे प्रश्न -
1) रंकाळा तलाव कोठे आहे ?
कोल्हापूर.
2) व्यक्तीचे वय वाढते तसा व्यक्तीचा रक्तदाब ..........
रक्तदाब वाढतो.
3) पोलीस भरती साठी शिक्षण किती लागते ?
12 वी पास.
4) PSI होण्यासाठी शिक्षण किती लागते ?
कोणत्याही शाखेतील पदवी.