जय जगतमहरणा - सूर्याची आरती मराठी | Suryachi Aarati In Marathi

 

आपण सूर्याची आरती 
(सूर्याची आरती मराठी) 
वाचणार आहोत. 
Suryachi aarati in marathi
 मित्रांनो आपल्या नवग्रह मंडलात पृथ्वीवर सर्वाधिक परिणाम करणारा तारा म्हणून सूर्याला फार महत्वाचे स्थान दिले आहे. सूर्य हा तारा आपल्या सुर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. तसेच सूर्याला महत्वाचे स्थान आहे म्हणून वारांमधे सर्वप्रथम रविवार असतो. 

जय जगतमहरणा - सूर्याची आरती मराठी | Suryachi Aarati In Marathi 

_______________________________________________
सुर्याची आरती मराठी
सुर्याची आरती मराठी




जय जय जगतमहरणा दिनकर सुखकिरणा |

उदयाचल जगभासक दिनमणि शुभस्मरणा ||

पद्मासन सुखमूर्ती सुहास्यवरवदना |

पद्मकर वरदप्रभ भास्वत सुखसदना ||१||


जय देव जय देव जय भास्कर सूर्या |

विधिहरिशंकररूपा जय सुरवरवर्या || ध्रु. ||


कनकाकृतिरथ एकचक्रांकित तरणी |

सप्ताननाश्वभूषित रथिं त्या बैसोनी ||

योजनसहस्त्र द्वे द्वे शतयोजन दोनी | 

निमिषार्धें जग क्रमिसी अदभुत तव करणी ||

जय देव जय देव जय भास्कर सूर्या. ||२||


जगदुभ्दवस्थितिप्रलयकरणाद्यरुपा |

ब्रह्म परात्पर पूर्ण तू अद्वय तद्रूपा ||

तत्वंपदव्यतिरिक्ता अखंड - सुखरूपा | 

अनन्य तव पद मौनी वंदिति चिद्रूपा ||

जय देव जय देव जय भास्कर सूर्या. ||३||