अनेक शब्दांबद्दल एक शब्द
शब्दसमूहाबद्दल एक शब्द One Word Substitution In Marathi
अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठी (One word about many words in marathi) : नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या पोस्ट मध्ये अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठी (One word about many words in marathi) बघणार आहोत. म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये ह्या शब्दांना खूप महत्वाचे स्थान आहे. हे '(अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठी)' हा मराठी व्याकरणातला अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा, mpsc, upsc, जिल्हा परिषद भरती, पोलीस भरती, म्हाडा भरती, शिपाई, परिचर , यांसारख्या सरळसेवा भरती चा अभ्यास करत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे.
पोलीस भरती सामान्य ज्ञान मराठी
शब्दसमूहाबद्दल एक शब्द मराठी |
तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे सर्व विद्यार्थ्यांनी
' मराठी व्याकरण '
पोलीस भरती तसेच तलाठी भरती प्रश्नसंच
अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठी (One word about many words in marathi) दुसऱ्याच्या गुणांची कदर करणारा
1) ज्याचा कधीही वीट येत नाही असे
- अवीट.
2) मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण
- अन्नछत्र.
3) देवलोकातील स्त्रिया
- अप्सरा.
4) कधीही विसरता न येणारे
- अविस्मरणीय.
5) वर्णन करता येणार नाही असा
- अवर्णनीय.
6) पडदा दूर करणे
- अनावरण.
7) थोडक्यात समाधान मानणारा
- अल्पसंतुष्ट.
8) कमी आयुष्य असलेला
- अल्पायुषी. अल्पायू.
9) तीन महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे
- त्रैमासिक.
10) भाषण ऐकण्यासाठी जमलेले लोक
- श्रोते.
11) हत्ती बांधण्याची जागा
- हत्तीखाना.
12) आपल्याच मताप्रमाणे चालणार
- हटवादी.
13) मनाला पाझर फोडणारी
- हृदयद्रावक.
14) कष्ट करून उपजीविका करणारा माणूस
- श्रमजीवी.
15) प्रगतीसाठी धडपडणारे
- होतकरू.
16) शरण आलेला
- शरणागत.
17) वेश बदलणे
- वेशांतर.
18) गावाच्या प्रवेशद्वार ला काय म्हणतात
- वेस.
'वेस म्हणजे गावाची प्रवेशद्वार'
19) व्यभिचारी स्त्री
- व्यभिचारिणी.
20) पाहण्यास जमलेले लोक
- प्रेक्षक.
अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठीत
'प्रेक्षक म्हणजे काय' ?
- पाहण्यास जमलेले लोक
21) शत्रूला सामील झालेला
- फितूर.
22) पूर्वी जन्मलेला
- पूर्वज.
23) 'घोडे बांधण्याची जागा'
- पागा.
24) पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे
- पाक्षिक.
25) भोवतालचा प्रदेश
- परिसर.
26) दुसऱ्या देशात जाणे
- परदेशगमन.
27) दुसऱ्याच्या जीवावर जगणारा
- परोपजीवी.
28) जग जिंकणारा
- जगज्जेता.
29) गावाभोवतालचा तट
- गावकुस.
30) डोंगरात राहणारे लोक
- गिरिजन.
शब्द्समुहाबद्द्ल एक शब्द मराठी
31) चारही वेदांमध्ये पारंगत असणारा
- चतुर्वेदी.
32) चाहड्या सांगणारा
- चाहडखोर.
33) चुगल्या सांगणारा
- चुगलखोर.
34) केवळ पाण्यात राहणारा
- जलचर.
35) जाणण्याची इच्छा
- जिज्ञासा.
36) दिवसाला भिणारे
- दिवभीत.
37) अस्वलांचा खेळ करणारा
- दरवेशी.
38) सूर्याचे दक्षिणेकडे जाणे
- दक्षिणायन.
39) मोठ्याने केलेले पाठांतर
- घोकंपट्टी.
40) गुप्त बातम्या काढणारा
- गुप्तहेर.
One word about many words in marathi
41) गुणांची कदर करणारा
- गुणग्राहक.
42) मनाला आल्हाद देणारा
- आल्हाददायक.
43) देव आहे असं मानणारा
- आस्तिक.
44) सतत पैसे खर्च करणारा
- उधळ्या.
45) शिल्लक राहिलेले
- उर्वरित.
46) जे साध्य होत नाही ते
- असाध्य.
47) तुलना करता येणार नाही असे
- अतुलनीय.
48) निराश्रित, निराधार मुलांचा सांभाळ करणारी संस्था
- अनाथाश्रम.
49) पूर्वी कधीही न ऐकलेले
- अश्रुतपूर्व.
50) पूर्वी कधीही न पाहिलेले
- अदृष्टपूर्व.
51) कोणाच्याही पक्षात सामील न होणारा
- अपक्ष.
52) ज्याला कोणतेही उपमा देता येत नाही असा
- अनुपम, अनुपमेय.
53) ज्याला कधीही मृत्यू नाही असा
- अमर.
54) सूचना, कल्पना न देता येणारा पाहुणा
- आगंतुक.
55) कधीही नाश पावणार नाही असा
- अविनाशी.
56) ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा कोण
- अजिंक्य.
57) ढगांनी झाकलेले
- अभ्राच्छादित.
58) कोणाचाही आधार नाही असा कोण
- अनाथ.
59) ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे
- अनमोल.
60) मागून जन्मलेला
- अनुज.
61) एखाद्या गोष्टीची उणीव असणे
- अभाव.
62) 'एकाच वेळी अनेक अवधाने राखून काम करणारा'
- अष्टावधानी.
63) पायामध्ये पादत्राणे न घालता चालणारा
- अनवाणी.
64) अनुकरण करणारे
- अनुयायी.
65) जे टाळले जाऊ शकत नाही असे काय
- 'अपरिहार्य'.
66) पूर्वी कधीही न घडलेले
- अभूतपूर्व.
67) मडकी बनविणारा
- कुंभार.
68) सतत पैसे खर्च करणारा माणूस
- खर्चीक.
69) सापांचा खेळ करणारा
- गारुडी.
70) गडाचा म्हणजेच किल्याचा प्रमुख अधिकारी कोण असतो
- गडकरी.
Many Words From One Word In Marathi
71) जन्मतःच श्रीमंत असलेला
- गर्भश्रीमंत.
72) आपल्या बरोबर खेळत भाग घेणारा
- खेळगडी, सवंगडी.
73) अनुभव नसलेला
- अननुभवी.
74) एकाला उद्देशून दुसऱ्यास बोलणे
- अन्योक्ती.
75) अग्नीची पूजा करणारा
- अग्निपूजक.
76) विविध गोष्टीत प्रवीण असलेला
- अष्टपैलू.
77) अतिशय उंच
- अत्युच्च.
78) अन्न देणारा
- अन्नदाता.
79) मोजता येणार नाही इतके
- अगणित, असंख्य.
80) आवरता येणार नाही असे
- अनावर.
81) जिवंत असेपर्यंत
- आजन्म.
82) मरण येईपर्यंत
- आमरण.
83) 'ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा'
- आजानुबाहू.
84) लग्नात देण्याची भेट
- आहेर.
85) ('हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत')
- ('आसेतुहिमाचल')
86) नसलेली गोष्ट आहे असे वाटणे
- आभास.
87) 'पायापासून डोक्यापर्यंत'
- आपादमस्तक.
88) स्वतःच लिहलेले स्वतःचे चरित्र
- आत्मचरित्र, आत्मवृत्त.
89) बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण याला काय म्हणतात
- आबालवृद्ध.
90) अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी
- आदिवासी.
91) उदयाला येत असलेला
- उदयोन्मुख.
92) ज्याच्यावर उपकार झाले आहे असा
- उपकृत.
93) घरदार नसलेला
- उपऱ्या, बेघर.
marathi sweet words
94) जमिनीवर व पाण्यात दोन्हीही ठिकाणी राहू शकणारा त्याला काय म्हणतात
- उभयचर.
95) आकाशातील ताऱ्यांच्या पट्टा
- आकाशगंगा.
96) थोरांनी लहानांच्या प्रती व्यक्त केलेली सदिच्छा
- आशीर्वाद.
97) विशिष्ट मर्यादा ओलांडून जाणे
- अतिक्रमण.
98) आपल्या घरी पाहूणा म्हणून आलेला
- अतिथी.
99) ज्याचा थांग म्हणजेच खोली लागत नाही असे
- अथांग.
100) ज्याने लग्न केले नाही असा
- ब्रह्मचारी, अविवाहित.
101) ज्याला एकही शत्रू नाही असा
- अजातशत्रू
102) ज्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा
- अद्वितीय, अजोड
103) केलेले उपकार जाणणारा
- कृतज्ञ.
104) केलेले उपकार विसरणार
- कृतघ्न.
105) कामाची टाळाटाळ करणारा
- कामचुकार.
106) कानास गोड लागणारे काय
- कर्णमधुर.
107) कष्टाने मिळणारी गोष्ट
- कष्टसाध्य.
108) अंग राखून काम करणारा
- अंगचोर.
109) दुसऱ्याच्या ताब्यात असलेला
- अंकित.
110) सूर्याचे उत्तरेकडे जाणे
- उत्तरायण.
111) शापापासून सुटका
- उःशाप.
112) सतत उद्योगात मग्न असणारा
- उद्यमशील.
113) देशाची सेवा करणारा
- देशभक्त, देशसेवक.
114) दररोज प्रसिद्ध होणारे
- दैनिक.
115) त्या वेळचा
- तत्कालीन.
116) तहांच्या अटींचा तजुर्मा
- तहनामा.
117) तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख
- ताम्रपट.
118) तोंडावर स्तुती करण्याचा गुण
- तोंडपूजेपणा.
119) दानधर्म करण्यात प्रसिद्ध असणारा
- दानशूर.
120) गावाचा कारभार ला काय म्हणतात
- गावगाडा.
121) देवळाच्या, मंदिराच्या आतील भागाला काय म्हणतात
- गाभारा.
122) पंचांच्या माध्यमातून गावाचे स्थानिक शासन चालविणारी संस्था
- ग्रामपंचायत.
123) अचानक आलेले संकट
- घाला.
124) गुरूंकडे आपल्याबरोबर शिकणारा
- गुरुबंधू.
Vocabulary in marathi
125) चार पायांवर चालणारा
- चतुष्पाद.
126) नावाचा एकसारखा उच्चार म्हणजे काय
- घोषा.
127) चक्रपाणि कशाला म्हणतात
- ज्याच्या हातात चक्र आहे असा
128) गावातील कामकाजाची जागा
- चावडी.
129) कायम जीवित राहणारा
- चिरंजीव.
130) जिचे मुख चंद्राप्रमाणे आहे अशी कोण
- चंद्रमुखी.
131) जिल्ह्याचा कारभार पाहणारी संस्था
- जिल्हा परिषद.
132) रात्री जागून गावात पहारा करणारा
- जागल्या.
133) जेथे जन्म झाला तो देश
- जन्मभूमी.
134) नावाचा एकसारखा उच्चार म्हणजे काय
- जयजयकार, जयघोष.
135) कर्तव्याकडे पाठ फिरविणारा
- कर्तव्यपरामुख.
136) ज्याच्या अंगी एखादी कला असणारा
- कलाकार, कलावंत.
137) दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा
- कनवाळू.
138) कुंजात विहार करणारा
- कुंजविहारी.
139) शीघ्रतेने किंवा अकस्मात घडून आलेला बदल
- क्रांती.
140) जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी
- गजगामिनी.
141) ज्याच्याकडे कोटी रुपये आहेत असा
- कोट्यधीश.
142) धान्य साठवण्याच्या जागेला काय म्हणतात
- कोठार.
143) अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा ला काय म्हणतात
- कृष्णपक्ष.
144) कार्य करण्यास सक्षम असलेला
- कार्यक्षम.
145) सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय
- कामधेनू.
146) भाकरी करण्याची लाकडी परात म्हणजे काय?
- काथवट.
147) जिचे डोळे कमलपुष्पाप्रमाणे सुंदर आहेत अशी
- कमलाक्षी.
148) आपले कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असा
- कर्तव्यदक्ष, कर्तव्यतत्पर.
149) निरनिराळ्या राष्ट्रांतील
- आंतरराष्ट्रीय.
150) श्रम न करता खाणारा
- ऐतखाऊ.
151) लहान मुलांना झोपविण्यासाठी म्हटलेले गीत
- अंगाईगीतं.
152) सतत एकटे राहण्याची आवड असलेला
- एकलकोंडा.
153) हळूहळू घडून येणारा बदल
- उत्क्रांती.
154) दोन वेळा जन्मलेला
- द्विज.
155) सतत उद्योग करणारा
- दिर्घोद्योगी.
156) खूप आयुष्य असलेला
- दीर्घायु , दीर्घायुषी.
nice sentence in marathi
157) तीन बाजुंनी पाणी असलेला प्रदेश ला काय म्हणतात
- द्वीपकल्प.
158) जहाजांना दिशा दाखविणारा मनोऱ्यावरील दिवा
- दीपस्तंभ.
159) एक देश सोडून दुसऱ्या देशात जाणे म्हणजे काय
- देशांतर.
160) नशिबावर विश्वास ठेवून वागणारा
- दैववादी.
161) कुणाचीही भीड न बाळगणारा
- निर्भीड, निर्भय.
162) मुलगा नसलेला कोण
- निपुत्रिक.
163) नाणी पडण्याच्या कारखान्याला काय म्हणतात
- टांकसाळ.
164) शेतात बांधलेली पडवी म्हणजे काय
- पडळ.
165) फार दिवसांनी येणारी संधी
- पर्वणी.
166) रात्री फिरणारा
- निशाचर.
167) ठराविक कालावधीनंतर प्रसिध्द होणारे
- नियतकालिक.
168) चारित्र्यावर कसलाही ठपका नसणारा
- निष्कलंक
169) मायभूमीस व घरादारास मुकलेले
- निर्वासित.
170) कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा
- निष्पक्षपाती.
171) न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा
- न्यायनिष्ठुर.
172) कसलीही अपेक्षा नसणारा
- निरपेक्ष.
173) नऊ दिवस टिकणारा ताप
- नवज्वर.
174) नवीन मतांचा पुरस्कार करणारा
- नवमतवादी.
175) रात्र आणि दिवस एकाच गोष्टीचा नाद असलेला
- नादिष्ट.
176) संपूर्ण शरीरभर किंवा पायाच्या नाखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत
- नखशिखांत.
177) उंचावरून कोसळणारा पाणलोट
- धबधबा.
178) दोन्ही थड्या म्हणजेच किनारे भरून वाहणारी नदी
- दुथडी.
179) एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे म्हणजे काय
- धर्मांतर.
180) चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा
- दुराग्रही.
181) साध्य करावयाचे आहे ते म्हणजे काय
- ध्येय.
182) यात्रेकरूंच्या निवाऱ्यासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत
- धर्मशाळा.
183) एकाने दुसऱ्यास सांगणे या पद्धतीने वर्षानुवर्षे चालत आलेली, परंतू आधार नसलेली गोष्ट
- दंतकथा.
184) पाणी साचलेली जागा
- पाणथळ.
hard marathi words
185) शेतातून जाणारी अरुंद वाट
- पायवाट, पाणंद
186) पोरबुद्धीने वागणारा
- पोरकट.
187) पूर्व भागातील पूर्वेकडील देशांतील लोक
- पौर्वात्य.
188) पाहण्यायोग्य अनेक वस्तु मांडलेली जागा
- प्रदर्शन.
189) लोकांच्या मताने चाललेले राज्य
- प्रजासत्ताक.
190) एकमेकांवर अवलंबून असणारे
- परस्परावलंबी.
191) राजाचे बसण्याचे आसन
- सिंहासन.
192) सोन्याच्या वस्तू बनविणारा
- सोनार.
193) लाकडाच्या वस्तू बनविणारा
- सुतार.
194) सुखाच्या आहारी गेलेला
- सुखासीन.
195) राजाचा शिक्का सांभाळणारा
- शिक्केनीस.
196) लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य
- लोकशाही.
197) तोफ असलेला गाडा
- रणगाडा.
198) कलेची आवड असणारा
- रसिक.
199) वनात राहणारे लोक
- वनवासी.
200) चांगले आचरण असणारा
- सदाचारी.
201) सामान्य माणसामध्ये न आढळणारा
- लोकोत्तर.
SUMMARY ( सारांश ) -
मित्रांनो अशा प्रकारे आपण अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठी (One word about many words in marathi) बघितले आहे. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल.
FAQ - shabd samuh badal ek shabd in marathi
1) अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठी म्हणजे काय ?
उत्तर - अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठी म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर ही एक शब्दाची व्याख्या असते.
2) अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठी हे शब्द आपण कधी वापरतो ?
उत्तर - आपल्या दैनंदिन जीवनात तसेच व्यावहारिक जीवनात या शब्दांचा वापर आपण आपल्या बोलीभाषेत करत असतो.
3) what is one word for many words called ?
answer - One word Marathi for many words, in short, is the definition of a word.
4) शब्द्समुहासाठी एक शब्द मराठी ,शब्द समूह म्हणजे काय , पुढील शब्द्समुहासाठी एक शब्द लिहा , शब्द समूह म्हणजे काय ,शब्द्समुहाबद्दल एक शब्द मराठी 400 ,